सातारा

पुढील आदेश येईपर्यंत शिरवळ शहर राहणार बंद

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा)  : शिरवळ पुन्हा एकदा जिल्ह्याचा कोरोना हॉटस्पॉट ठरू लागल्यानंतर शनिवारी दुपारी तातडीने तहसीलदार दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या पुढील आदेशापर्यंत शिरवळ शहर पूर्णतः बंद करण्यात आले. या वेळी अत्यावश्‍यक सेवा शासकीय नियमानुसार सुरू राहणार आहे. आज दुपारी मेडिकल सेवा व बॅंका वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले. 

शहरात दोनच दिवसांत कोराना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली असून, राञी उशिरा शहराच्या सीमाही सील करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली. हे शहर कंटेनमेंट झोन जाहीर केले होते. मात्र, स्थानिक नागरिक व व्यापारी यांच्या मागणीनुसार यामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. मात्र, तरीही कोरोना मीटर थांबत नसल्याने तातडीने आज दुपारी शिरवळ शहर बंद करण्यात आले. शहरात एकाच दिवशी 28 ते 32 रुग्णसंख्या आढळून येऊ लागली. तालुक्‍यात सर्वाधिक रुग्णसंख्या शिरवळ शहरात वाढू लागली. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही शिरवळ जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरले होते. दुसऱ्या लाटेतही याच मार्गावर शिरवळ शहर दिसू लागल्याने नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा व कोरोनाच्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील यांनी केले आहे. 

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला 

VIDEO : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; दोन दिवसात तब्बल 1274 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

मुंबईत 'ग्रीन फॉरेस्ट' उभारणार, कांजूरमार्ग कचरा डेपोच्या दुर्गंधीपासून सुटका होणार; एकनाथ शिंदे यांचे आदेश जारी

SCROLL FOR NEXT