सातारा

बेकायदेशीर सदनिका विक्री प्रकरणी वर्धा जिल्ह्यातील दांपत्यास पुण्यात अटक

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : येथील सदनिकेवर बॅंकेचे कर्ज असूनही बेकायदेशीर विक्री करून दोघांची फसवणूक करून तीन वर्षांपासून फरारी असलेल्या सुनील तोटे व कल्पना तोटे या दांपत्यास पुण्यात अटक करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. 
 
उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती, 2017-18 मध्ये पोपट दगडू जाधव (रा. मिरजे, ता. खंडाळा) व विजय लक्ष्मण मोहिते (रा. कोडोली, ता. कडेगाव) यास बांधकाम व्यावसायिक सुनील देवराम तोटे व कल्पना सुनील तोटे (मूळ रा. ताडगाव, जि. वर्धा व सध्या रा. वारंजे, पुणे) यांनी शिरवळ येथील सदनिका बॅंकेला तारण असूनही विक्री केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांत तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. हे दोघेही फरारी होते.

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा  

तोटे दांपत्यास पुण्यातून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या घटनेचा तपास पोलिस रवींद्र कदम करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT