सातारा

विजयी मिरवणुक भाेवली; भाजप सरपंचांसह 52 जणांवर गुन्हा दाखल

सिद्धार्थ लाटकर

सातारा : शिरवळच्या विशेष ग्रामसभेत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव टळल्यानंतर पानसरेंच्या समर्थकांनी विजयी मिरवणुक काढली. जिल्ह्यात जमावबंदी असताना विजयी मिरवणुक काढल्याने शिरवळ पोलिस ठाण्यात सरपंच यांच्यासह सुमारे 52 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अजित पवारांचा डाव; साता-यातील कार्यकर्ते चक्रव्यूहात!

शुक्रवारी शिरवळमध्ये विशेष ग्रामसभा झाली. या सभेत सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी त्यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव टळला. जनतेने थेट निवडून आलेल्या सरपंचांना पुन्हा कौल दिला. यामुळे आनंदित झालेल्या पानसरेंच्या सर्मथकांनी सरपंच लक्ष्मी पानसरे यांची विजयी मिरवणुक काढली. दरम्यान सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तसेच सरपंच पानसरे यांना देखील शिरवळ पोलिसांनी त्याबाबत नोटीस काढून बजावले होते. तरीही विजयी मिरवणुक निघाल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

शिरवळकरांचा भाजपच्या सरपंचांवर विश्वास; राष्ट्रवादीसह विरोधी गटाची 714 मतांनी धोबीपछाड

यामध्ये सरपंच लक्ष्मी पानसरे, अनुप सूर्यवंशी, चंद्रकांत भुतकर, समीर पानसरे, प्रदीप माने, राहूल हाडके, अजिंक्‍य कांबळे यांच्यासह सुमारे 52 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबतची माहिती आणि फिर्याद सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू अहिरराव यांनी दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT