सातारा

इचलकरंजी- पुणे प्रवासात युवतीस छेडले; शिरवळला युवकास चाेप

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : इचलकरंजी (सांगली) ते पुणे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या युवकाने शेजारी बसणार्‍या युवतीशी अश्लील चाळे करून, हातवारे करून छेडछाड केल्याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात नाेंद झाली आहे. संबंधित युवकाच्या माेबाईवरुन त्याचा शाेध सुरु आहे.

पीडित युवतीने दिलेल्या माहितीनूसार इचलकरंजी ते पुणे या खासगी बसमधून पुण्याला जात असताना सत्तावीस क्रमांकाच्या सीटवर सांगली येथे एक युवक शेजारी येऊन बसला. तो डाव्या हाताच्या कोपऱ्यांना वारंवार अश्लील चाळे करत होता. तसेच आपल्या मित्राला फोनवरुन अश्लील शब्दात बाेलत होता. यानंतर संबंधित बस सातारा येथे नाष्ट्याला थांबली असता, त्याने नाष्ट्याला उतरण्याचा आग्रह केला. तसेच मोबाईलव्दारे व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा माेबाईल ताब्यात घेतला.

त्यानंतरही प्रवासात त्याचे चाळे सुरुच राहिल्याने अखेरीस शिरवळमध्ये सहप्रवाशांना मदतीचे आवाहन करुन बसमध्ये घडलेली सर्व हकीकत सांगितली. प्रवाशांनी शिरवळ जवळील लॉकिम फाट्याजवळ संबंधित युवकास बेदम चाेपले.

आपल्याच माणसांत राहिल्याच्या भावनेने मनावरचे नैराश्‍यही दूर झाले : शुभांगी पवार

संबंधित युवतीने छेडछेडाची तक्रार शिरवळ पाेलिसांत नाेंदविली आहे. दरम्यान युवकाच्या मोबाईलवरुन शिरवळ पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.ए. देसाई करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT