Shiv Jayanti 2023 Shivendra Singh Raje Bhosale ajinkyatara fort Mashal festival Gadpujan satara sakal
सातारा

Shiv Jayanti 2023 : अजिंक्‍यतारा उजळला शेकडो मशालींनी

साताऱ्यात शिवकालाची अनुभूती; शिवजयंतीच्‍या उत्‍साहाला उधाण

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शिवजयंतीच्‍या पूर्वसंध्येला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्‍या वतीने अजिंक्‍यतारा किल्‍ला शेकडो मशालींनी उजळून काढला. या मशाल महोत्‍सव, गडपूजन सोहळ्यामुळे अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावर शिवकाल अवतरल्‍याची अनुभूती सातारकरांना होत होती. येथे शिवजयंतीच्‍या उत्‍साहाला उधाण आले असून, राजधानी सातारा भगवी झाली आहे.

राज्‍यासह देशाच्‍या कानाकोपऱ्यात शिवजयंतीच्‍या उत्‍साहाला उधाण आले असून, मराठा साम्राज्‍याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात या उत्‍साहाने सर्व सीमा ओलांडल्‍या आहेत. येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्‍या वतीने शिवजयंतीच्‍या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून, याचाच भाग असणाऱ्या शिवकालीन शस्‍त्र प्रदर्शनास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

शनिवारी शिवजयंतीच्‍या पूर्वसंध्येला किल्‍ले अजिंक्‍यतारा मशाल महोत्‍सव, गड पूजन आणि मंगळाई देवीच्‍या आरतीचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमात शेकडो तरुण सहभागी झाले होते. गडपूजनाचा कार्यक्रम झाल्‍यानंतर शेकडो मशाली मुख्‍य दरवाजात प्रज्‍वलित करण्‍यात आल्‍या. यानंतर किल्‍ल्‍याची संपूर्ण तटबंदी शेकडो मशालींच्‍या प्रकाशात उजळून निघाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या केलेल्‍या जयघोषामुळे संपूर्ण किल्‍ला परिसर दणाणून निघाला होता. यानंतर शेकडो सातारकरांच्‍या उपस्‍थितीत किल्‍ल्‍यावरील मंगळाई देवीची आरती करण्‍यात आली. किल्‍ल्‍यावरील संपूर्ण कार्यक्रम सातारकरांना पाहता यावा, यासाठी साताऱ्याच्‍या मुख्‍य भागात एलईडी स्क्रीन उभारण्‍यात आल्‍या होत्‍या. या स्‍क्रीनसमोर जमत नागरिकांनी मशाल महोत्सवासह इतर कार्यक्रमांचा आनंद लुटला. भगवे ध्‍वज, पताकांमुळे शहराच्‍या गल्‍लीबोळात उत्‍साहाला उधाण आले असून, अनेक युवक शिवज्‍योत आणण्‍यासाठी गडकिल्‍ल्‍यांवर रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT