Divakar Ravate esakal
सातारा

शिवसेना शेवटच्या घटकापर्यंत पोचवा; दिवाकर रावतेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

'शिवसेना सामान्य जनतेचा पक्ष आहे, त्यासाठी पक्षाची संघटन बांधणी मजबूत करा.'

कऱ्हाड (सातारा) : शिवसेना (Shiv Sena) सामान्य जनतेचा पक्ष आहे. तो वाढविण्यासाठी सामान्यातील सामान्य घटकापर्यंत पदाधिकारी पोचला पाहिजे. त्यासाठीची पक्षाची संघटन बांधणी मजबूत करा, अशा सूचना शिवसनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते (Divakar Ravate) यांनी येथे केली.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकांच्या (Zilla Parishad Election) तयारीचा आढावा श्री. रावते यांनी घेतला. त्यावेळी तो बोलत होते. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत शेलार, जिल्हा संघटीका अनिता जाधव उपस्थित होते. श्री. रावते यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय पदाधिकांऱ्यांशी संवाद साधून त्याची माहिती घेतली. या वेळी राज्यमंत्री देसाई यांनी शासनाने केलेल्या कामाची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्षात घेतलेल्या विविध निर्णयाचा आढावाही देसाई यांनी घेतला.

कोविडच्या (Coronavirus) कठीण काळातसुध्दा महाराष्ट्राने विविध क्षेत्रात प्रगती केल्याचे त्यांनी नमूद केले. श्री. बानगुडे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संघटना पातळीवरील अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी कऱ्हाड व पाटण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, तालुकाप्रमुख नितीन काशीद, सनीश पाटील, राहल कुंभार, उपजिल्हा संघटिका कविता यादव, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, काकासाहेब जाधव, संजय चव्हाण, माणिक आन्नारकर, उत्तम जाधव, सुनिल पाटील, शंकर वीर, शहरप्रमुख शशिराज करपे, मधुकर शेलार, उपशहरप्रमुख शेखर बर्गे, अक्षय गवळी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रेग्नंट पत्नी गाडीत, मला जाऊ द्या', पतीचा भररस्त्यात ठिय्या; राज्यपालांसाठी रस्ता बंद केल्यानं वाहतूक कोंडी, VIDEO VIRAL

Navi Mumbai: लेकाकडून आई-वडिलांचा अमानुषपणे छळ, मारहाण करत घरातून हाकललं अन्...; निर्दयी मुलाच्या कृत्याने नवी मुंबईत खळबळ

'ती सध्या काय करते' तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई! अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार?; फडणवीसांची माहिती

गुरु गोचरामुळे दोन राशींच्या लोकांची होणार प्रगती ! जाणून घ्या आजचे तुमचे आर्थिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT