shiv sena leader ashok bhavake dies in accident satara
shiv sena leader ashok bhavake dies in accident satara sakal
सातारा

शिवसेनेचे नेते अशोक भावके यांचे अपघाती निधन

(शब्दांकन - सचिन शिंदे)

उंडाळे : घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोक भावके यांचे मंगळवारी रात्री अपघाती निधन झाले. घोगाव गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर उभे असताना त्याना कारने धडक दिली. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

श्री. भावके यांनी 1995 ला कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेथून त्यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यानी संतकृपा शिक्षण संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. मातोश्री सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहून त्यानी पुणे आणि मुंबई येथे बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. काल (मंगळवारी) रात्री ते घोगाव येथे आले होते. रस्तकडेला उभे राहिले असताना त्यांना कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT