Shambhuraj Desai vs Anil Parab  esakal
सातारा

Shambhuraj Desai : विरोधकांनी आतातरी रडीचा डाव खेळणं बंद करावं; शंभूराज देसाईंनी अनिल परबांना सुनावलं

विरोधकांनी आतातरी रडीचा डाव खेळणे बंद करावे. निकालावर आक्षेप असेल तर सर्वोच न्यायालयात जावून न्याय मागावा.

हेमंत पवार

शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाची २०१८ मधील नवीन घटना सादर केली नसल्याच्या मुद्यावर नार्वेकर यांनी हा निकाल दिला.

कऱ्हाड : विरोधकांनी आतातरी रडीचा डाव खेळणे बंद करावे. निकालावर आक्षेप असेल तर सर्वोच न्यायालयात जावून न्याय मागावा. तिथे सुनावणी होईल आणि न्यायालय निकाल देईल. दररोज काही तरी नवीन काढून वक्तव्य करायचे, कागद दाखवायचा हे बरोबर नाही, अशी टीका अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रता याचिका निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष असल्याचा निकाल देत भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवली.

शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाची २०१८ मधील नवीन घटना सादर केली नसल्याच्या मुद्यावर नार्वेकर यांनी हा निकाल दिला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री देसाई बोलत होते.

देसाई पुढे म्हणाले, पक्षाच्या घटनेत बहुमताने बदल करायचे असतील तर राष्ट्रीय कार्यकारणीची सभा घ्यावी लागते. त्याच्या विषय पत्रीकेवर विषय नमूद करावा लागतो. बहुमताने तो विषय मंजूर झाला तर त्यात सुधारणा घटनेत केल्यानंतर राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाची दुरुस्तीला मान्यता घेण्यसाठी ती सादर करावी लागते. निवडणूक आयोगाला त्यासंदर्भात काही शंका असल्यास पक्षाच्या प्रमुखांना विचारतात.

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला आहे. त्यावर आक्षेप असेल तर सर्वोच्य न्यायालयात जावे. आमची सुनावणी, साक्षी पुरावे, जबाब होवून विधासभा अध्यक्षांनी निकाल दिला आहे. विरोधकांनी रडीचा डाव खेळण्यापेक्षा सर्वोच्य न्यायालयात जावून न्याय मागावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT