Udayanraje-shivendra.jpg System
सातारा

गोवा लॉकडाउन झालेय! तुम्हीही साता-यात आहात, त्यांना जागे करा

त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा आणि सातारकरांसाठी पालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंना केली आहे.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोनाचा (coronavirus) संसर्ग वाढत आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ सातारा शहरात होत आहे. जिल्हा रुग्णालय, जंम्बो कोव्हीड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या रांगा पहायला मिळत आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा पालिकेकडून (Satara Muncipal Council) नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही. कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का बसून आहे, असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केला आहे. सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी पालिकेने सुरु करावा असेही त्यांनी म्हटले आहे. (shivendraraje udayanraje goa lockdown satara marathi news)

दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कोरोना संदर्भात बैठक घेतली. आता गोवा राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. खासदार उदयनराजे सुद्धा साताऱ्यात आहेत हे प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांमुळे समजले. आता खासदार उदयनराजेंनीच या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून तुमच्याशिवाय पालिका प्रशासन आणि नगरसेवक हलणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा आणि सातारकरांसाठी पालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंना केली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT