सातारा

शेतकऱ्यांनी विरोध करू नये, माझे प्रयत्न तुमच्यासाठीच सुरु आहेत : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा वाढीव एमआयडीसीसाठी टप्पा क्रमांक तीन व चारमधील देगाव, निगडी आणि वर्णे याठिकाणी योग्य दर मिळाला, तर शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार होतील. रोजगारनिर्मिती, भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी वाढीव एमआयडीसी होणे गरजेचे आहे. याठिकाणी 11 लाख रुपये हेक्‍टरी एवढा उच्चतम दर असून, नवीन कायद्यानुसार चारपट म्हणजेच 44 लाख रुपये हेक्‍टरी दर शेतकऱ्यांना मिळू शकतो, तरीही तडजोडीअंती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
 
सातारा वाढीव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक तीन (देगाव) आणि टप्पा क्रमांक चार (निगडी- वर्णे) भूसंपादनाबाबत श्री. भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत चर्चा केली. या वेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक श्री. खापरे उपस्थित होते.
 
देगाव, निगडी, वर्णे वाढीव एमआयडीसी मंजूर असून, तसे शिक्केही जमिनीवर पडले आहेत. रोजगारनिर्मितीसाठी ही एमआयडीसी लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील आणि शेतकऱ्यांच्या जमिनीला पैसेही मिळतील. त्यासाठी भूसंपादन तातडीने झाले पाहिजे. रास्त भाव मिळाला, तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. भूसंपादन करताना बागायती क्षेत्र, तसेच घरबांधणीसाठी झालेले प्लॉटिंग, नागरी वस्ती आणि देगाव पाझर तलाव वगळून डोंगरालगतची पडीक, माळरान, नापीक जमीन संपादन करावी, अशी सूचना करून प्रती हेक्‍टरी 11 लाख रुपये हा उच्चतम दर आहे. 2013 च्या सुधारित कायद्यानुसार या उच्चतम दराच्या चौपट म्हणजेच 44 लाख रुपये प्रती हेक्‍टर दर होणार आहे. शेतकरी आणि शासन यांच्यात तडजोड होऊन शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळाला पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी मुद्दे मांडले. बैठकीअंती जिल्हाधिकारी सिंह यांनी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा याबाबत पाठपुरावा करू. शेतकऱ्यांनीही भूसंपादनासाठी सहकार्य केले पाहिजे. चांगला दर मिळत असेल तर विरोध करू नये. 
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार


एसपी तेजस्वी सातपुतेंच्या टीमपुढे उभे ठाकले यांचे चॅलेंज 

ग्रामस्थांच्या काळजीने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असा पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT