सातारा

दुधातील भेसळ, गुटखा विक्री तोबडतोब बंद करा, शिवसेनेचा प्रशासनाला गर्भित इशारा

सकाळवृत्तसेवा

सातारा : भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना विकले जाऊ नयेत, यासाठी विक्रेत्यांच्या पदार्थांची व परवान्यांची तातडीने तपासणी करावी, असे निवेदन शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख निमिश शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहायक उपायुक्तांना नुकतेच दिले आहे. दिवाळी आणि आगामी काळातील यात्रा-जत्रांच्या पार्श्‍वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे. 

ग्राहकांना चांगले पदार्थ मिळावेत, यासाठी मिठाई, बेकरींची तपासणी करावी, तसेच मंडईत कडधान्याला रंग लावून विक्री सुरू आहे, तसेच दुधातही भेसळ होत आहे. गुटखा विक्रीही बंद करावी. त्याबाबत कार्यवाही करावी. किराणा दुकानातही भेसळयुक्त कच्चामाल विकला जातो. प्रशासनाने अचानक धाडी घालून नमुने तपासणीला घ्यावेत व नागरिकांना शुद्ध माल, पदार्थ मिळतील असा दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना श्री. शहा, तसेच उपशहरप्रमुख सयाजी शिंदे, मितीन लकेरी, ऍड. उमेश लकेरी, मनोज बोंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT