Neelam Gorhe
Neelam Gorhe esakal
सातारा

कोण कोणाच्या दावणीला बांधलेलं नाही, आता दावणचं मजबूत करू

उमेश बांबरे

अत्याचारप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत.

सातारा : महाबळेश्वरच्या (Mahabaleshwar Case) घटनेतील युवतीवरील अत्याचारप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत आणि मग कोणाला सहआरोपी करायचे याची भाषा करावी. गुन्हा मुलांनी केल्यावर शिक्षा वडिलांना देण्याचे कोणत्या कायद्यात बसते, हे सांगून आमच्यावर आरोप करण्यापूर्वी ते सिद्ध करावे नाही, तर ते आरोप तत्काळ मागे घ्यावेत, असे प्रत्युत्तर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, पीडित युवतीसह तिच्या कुटुंबीयांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची सूचनाही उपसभापती गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनास केली.

चित्रा वाघ यांनी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना महाबळेश्वर युवती अत्याचार प्रकरणात सहआरोपी करावे, तसेच पोलिस यंत्रणा महाविकास आघाडीच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला होता. याचा आज उपसभापती गोऱ्हे यांनी येथे पत्रकार परिषेदत समाचार घेतला. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते. निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महाबळेश्वर येथील पीडित युवतीच्या कुटुंबास मी भेटले. याबाबत जी घटना घडली त्याचा तपशील समजून घेतला आहे. ज्या सोसायटीत त्या राहतात. तिथे त्या मुलीला कोणताही त्रास नसल्याचे सांगितले. त्याशिवाय मुलीच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसह त्यांचे मनोधैर्य अथवा इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची सूचना मी केली आहे.’’

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात सादर करावेत. उगाच हवेत बाण मारू नयेत. त्यांच्याकडे किरीट सोमय्यासारखे कायदेतज्ज्ञ आहेत. कोणत्याही प्रकरणात विरोधी पक्ष बोलू शकतो; पण त्यांनी पुराव्यासह बोलावे. वाईच्या महिला पोलिस उपअधीक्षक चांगल्याप्रकारे तपास करत आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या दावणीला बांधलेले नाही. दावणीतून सुटलेलेच यांना भेटले असतील. त्यामुळे आता दावणचं मजबूत करू. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत. त्यांना शिक्षा होईलच; पण मुलांची शिक्षा वडिलांना द्यायची हा कोणता न्याय? वस्तुनिष्ठ चौकशी होईल व डीएनए चाचणीनंतरच चार्जशीट दाखल होईल. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी आरोप प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयात सिद्ध करावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT