covid 19 vaccine 
सातारा

सातारा : शहरासह ग्रामीण भागात कोविड लशीचा तुटवडा

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कोविडची दोन प्रकारची लस उपलब्ध केली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने लशीचे तब्बल पावणेपाच लाख डोसची मागणी शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला एक लाख 84 हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रात लशीचा तुटवडा जाणवू लागला आहे. येत्या दाेन दिवसांत शासनाकडून लस उपलब्ध हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली. 
 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कमी- जास्त प्रमाणात बाधित आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणावर व चाचण्यांवर विशेष भर दिला आहे. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा प्रत्यक्ष लसीकरणाच्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत लसीकरण केले जात आहे. इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्‍सिन अशा दोन लशींचा समावेश आहे.
 
जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पावणेपाच लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख 84 हजार डोसच उपलब्ध झालेत. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊनही लस मिळत नाही. लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
 
उर्वरित लस ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किती प्रमाणात उपलब्ध होणार याचा आकडा मात्र, प्रत्यक्ष लशीचे डोस उपलब्ध झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना आपल्याला केंद्रावर गेल्यावर लस मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. किमान मागणी केलेली लस तरी वेळेत उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. 

कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT