सातारा

काटा मारणाऱ्या उमेदवारांचा पदवीधर काटा काढतील : डॉ. श्रीमंत कोकाटे

गिरीश चव्हाण

सातारा : पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली असून, गेली दोन वर्षे आम्ही या मतदारसंघात काम करत असून, पदवीधर विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. चारही पक्षांकडून यापूर्वी अनेक वेळा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पडीक उमेदवारांना नाकारत पदवीधरांनी इतिहास घडविण्याचे आवाहन डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केले. या वेळी संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, चंद्रकांत पाटील उपस्थित हाेते.
 
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. कोकाटे हे उमेदवार असून, त्या प्रचारासाठी ते आज सातारा दौऱ्यावर आले होते. कोकाटे म्हणाले, ""पदवीधर विरुद्ध साखर कारखानदार असा मुकाबला पुणे विभागात होत आहे. ज्या कारखानदारांनी काटा मारत खिसे भरले. त्यांनाच प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली आहे. काटा मारणाऱ्या या उमेदवारांचा काटा पदवीधर काढतील.'' 

ही पदवीधरची निवडणूक आहे, आता माघार नाही ; डॉ. श्रीमंत कोकाटे

प्रवीणदादा गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करत कोकाटे यांच्या विजयाचा दावा केला. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT