सातारा

अडीचशे वर्षांची परंपरा असणारा फलटणतील श्रीराम रथोत्सव रद्द

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : "कोरोना'चा प्रसार अद्याप सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी यंदाची येथील श्रीराम रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. दर वर्षी यात्रा काळात फेरीवाले व दुकानदारांकडून लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सलाही यंदा बंदी घालण्यात आली असून, हा आदेश मोडून जर स्टॉल लावले, तर पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

येथील प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेस प्रतिवर्षी राज्याच्या विविध भागांतून हजारो श्रीराम भक्त येत असतात. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा फलटण नगरीत अव्याहत सुरू आहे. दर वर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. यंदा 15 डिसेंबर हा रथाचा दिवस असून, कोरोनाचे संकट लक्षात घेता साध्या पद्धतीने गर्दी टाळून उत्सव साजरा करावा लागणार आहे. भाविकांनी यादिवशी प्रशासनास सहकार्य करावे, घरीच थांबून प्रभू श्रीरामांचे पूजन करून "कोरोना'मुक्तीचे साकडे घालावे व पुढल्या वर्षी पुन्हा दर वर्षीप्रमाणे उत्साहात रथोत्सव साजरा करावा, असेही आवाहन श्री. काटकर यांनी नागरिकांना केले आहे.

मायणीत सिद्धनाथाची रिंगावन यात्रा स्थगित; देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय
 
दरम्यान, रथोत्सवाच्या नियोजनासंबंधी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ. जगताप यांनी श्रीराम देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी. सामाजिक अंतराचे पालन करावे. मंदिर परिसरात दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे, असे सांगून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले. या बैठकीस तहसीलदार समीर यादव, पोलिस निरीक्षक प्रताप पोमण, पालिकेचे मुश्‍ताक महात, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे दशरथ यादव आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT