सातारा

पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती असणाऱ्या म्हसवड यात्रेस प्रशासनाचा नकार

सल्लाउद्दीन चोपदार, उमेश बांबरे

म्हसवड/सातारा : केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी असून यात्रा, जत्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. तरीही जिल्ह्यातील पहिली मोठी यात्रा असलेल्या येथील सिध्दनाथ व देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा रथोत्सव देवदिवाळीस म्हणजे मंगळवारी (ता. 15) होत आहे. कोरोना साथीत यात्रा भरणार का, याबाबत संभ्रमावस्था असली तरी नेहमीप्रमाणे यात्रा भरेल, या अंदाजाने यात्रा मैदानात विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटण्यासाठी साहित्यासह मुक्कामी येण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

येथील पुरातन श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानच्या एक महिन्याच्या कालावधीच्या पारंपरिक शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता मंगळवारी देवदिवाळीस "श्रीं'च्या उत्सव मूर्तींची रथ मिरवणुकीने केली जाणार आहे. या शाही विवाह सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमास राज्यासह परराज्यातून प्रत्येक वर्षी सुमारे पाच ते सहा लाखांच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. ही रथ मिरवणूक यात्रा फक्त आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या साथीमुळे राज्य सरकारने अध्यादेश काढून येत्या 31 डिसेंबरअखेर काही अटी, शर्तीवर लॉकडाउन कायम ठेवलेला आहे. त्यामुळे आजअखेर इतर गावांतील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांवर बंदी घालण्याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित तालुक्‍यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत. परंतु, माण तालुक्‍यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभत असलेल्या येथील यात्रेने यात्रांच्या हंगामाचा प्रारंभ होतो. त्यामुळे येथील यात्रेविषयी शासन वेगळा निर्णय घेऊ शकते, अशी भावना व समजूत या देवस्थानच्या भाविकांसह या यात्रेत येणाऱ्या विविध व्यावसायिकांमध्ये असल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. परिणामी, या यात्रेत प्रत्येक वर्षी येणाऱ्या व्यावसायिकांनी प्रत्येक वर्षातील यात्रा परिसरातील जागा मिळेल की नाही, या शंकेने व शासनानाचा यात्रा भरण्याबाबत होकार अथवा नकारात्मक जो काही निर्णय होईल, त्याची प्रतीक्षा न करता यात्रा मैदानात साहित्य घेऊन ठाण मांडू लागले आहेत. 

दरम्यान, कोरोनाच्या साथीचे रुग्ण म्हसवड शहरासह परिसरातील गावातही रोजच आढळून येत आहेत. विशेष बाब म्हणजे येथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाच्या साथीमुळे आजअखेर 36 रुग्ण दगावले असून, नियमित व आजअखेरच्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी असल्यामुळे शासन येथील यात्रा भरविण्यास परवानगी देईल, याची खात्री नाही. असे असतानाही प्रशासन मात्र यात्रा भरवली जाणार की नाही, याबाबत ठोस निर्णय जाहीर करत नसल्यामुळे भाविकांसह यात्रेत येणाऱ्या व्यावसायिकांत संभ्रमावस्था टिकून आहे. शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन यात्रेसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

कोरोनाचे लॉकडाउन शिथिल करताना केवळ मंदिरे उघडण्यास काही अटी-शर्तींवर परवानगी दिलेली आहे. पण, यात्रा, जत्रांना जिल्ह्यात परवानगी दिलेली नाही. यातूनही कोणी यात्रेच्या ठिकाणी येत असतील व त्यातून गर्दी होणार असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. 
-शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT