Six nominations filed for Satara market Committee election politics esakal
सातारा

Satara News : सातारा बाजार समितीसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज चार अर्ज दाखल झाले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज चार अर्ज दाखल झाले. यामध्ये विकास सेवा सोसायटी गटातून तीन अर्ज व ग्रामपंचायत गटातून एका अर्जाचा समावेश आहे. दिवसभरात ३५ अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता. ३) अंतिम दिवस आहे. त्यामुळे याच दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होणार आहेत.

सातारा तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज चार अर्ज दाखल झाले. यामध्ये विकास सेवा सोसायटी गटातून राहुल ढाणे (पाडळी), बाळासाहेब येवले (अंगापूर), संजय नलावडे (नागठाणे), तसेच ग्रामपंचायत गटातून संजय ढाणे (पाडळी) असे अर्ज दाखल केलेल्यांची नावे आहेत.

बुधवारी (ता. २९) सोसायटी गटातून रामचंद्र चव्हाण, अर्जुन साळुंखे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आतापर्यंत सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस सोमवारी (ता. ३) असून, त्याच दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील. त्याच दिवशी सातारा बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

SCROLL FOR NEXT