सातारा

खड्ड्यांत अनेकांचा जीव जातोय, तरीही लोकप्रतिनिधी गप्पच; रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : शहर परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक वेळा हे खड्डे चुकविताना दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. वाहनचालकांना इजा पोचत आहे, तसेच चारचाकी वाहने खड्ड्यांत आदळून त्यांचे नुकसान होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांकडे संबंधित विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अखेरीस वडूजात शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाच्या वतीने वडूज- दहिवडी रस्त्यावर नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर पडलेल्या खड्ड्यांतच आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांतच उभे राहून बांधकाम विभाग व नगरपंचायत प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. 

या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, नीलेश गोडसे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी उपसरपंच परेश जाधव, लखन पवार, मधुकर मोहिते, विक्रम गोडसे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. गुरव म्हणाले, "शहर परिसराला जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतीला सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधितांना हे खड्डे दिसत नाहीत का? रस्त्यांवर ऊस वाहतुकीची वाहने, तसेच अन्य दुचाकी, चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे संबंधितांनी तातडीने बुजवावेत अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन केले जाईल.'' 

विजय शिंदे म्हणाले, "शहर परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याकडे संबंधित विभाग दुर्लक्षितपणाची भूमिका घेत आहे. त्यामुळे संबंधितांनी हे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा संबंधित विभागाच्या मंत्र्यांची छायाचित्रे या खड्ड्यांत लावू, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यांत आणून बसवून त्यांना खड्डे बुजविण्यास भाग पाडू.'' 
या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT