Omicron Virus esakal
सातारा

देशात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला; परदेशातून आले 359 नागरिक

प्रशांत घाडगे

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

सातारा : अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron Virus) प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या विषाणूंचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत परदेशातून जिल्ह्यात ३५९ नागरिक आले असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामधील ८३ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Test) करण्यात आली असून तीन जण बाधित आढळले आहेत. पाच जणांचे नमुने जेन्युम सिक्वेसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकट (Coronavirus) नियंत्रणात आले असतानाच नव्याने आलेल्या ओमिक्रॉन विषाणूने डोके वर काढले आहे. मात्र, ओमिक्रॉनला थोपविण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहेत. सातारा जिल्ह्यात २८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत विविध देशांतून ३५९ परदेशी नागरिक आले. या नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांवर आरोग्य विभागाच्या (Health Department Satara) वतीने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क आहे. जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांचीही माहिती संकलित केली जात असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सूचना दिल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात अद्याप ओमिक्रॉनची लक्षणे आढळली नसून प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात कुठेही परदेशी नागरिक आल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

-डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानाच्या गणपतीच्या आरतीवरून वाद, ठाकरेंच्या नेत्याकडून शिंदेंच्या मंत्र्याचा पानउतारा, मग सत्कारात मागे ठेवून लागलीच घेतला बदला

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला वरुण राजाचा आशीर्वाद; भर पावसात ढोल ताशा पथकाकडून वादन

काय नवरा एक्सचेंज ऑफर सुरुये? 'घरोघरी मातीच्या चुली'चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- हिला सगळ्या भावांशी लग्न करायचंय...

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

SCROLL FOR NEXT