सातारा

चांगला पाऊस, पोषक वातावरणाचा 'माण'च्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्‍यात गतवर्षीपेक्षा जास्त 42 हजार 780 हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. गतवर्षी तालुक्‍यात जिल्ह्यात सर्वांत जास्त 30 हजार 567 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे रब्बीची पिके चांगली येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी रब्बीसाठी ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बाजरी, मूग पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पाऊसकाळ भरपूर असल्याने पिके चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्‍यात रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे. सुरवातीस कोरडवाहू तसेच वापसा आलेल्या क्षेत्रावर कांदा, मका आणि ज्वारीची पेरणी उरकली आहे. मळ्याच्या (चिबडाच्या) शेतामध्ये जसजसा वापसा येईल, तसे गहू, हरभरा पेरणीला गती आली आहे. त्यामुळे अजून पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. उन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उशिरा वापसा येणाऱ्या शेतात चाऱ्याची पिके घेतली जातील.

पालकांनो विश्‍वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा  

यंदा भरपूर पाऊस झाला असल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पारंपरिक पिकांसह नवीन पिकांची निवड करावी. त्याबरोबर अंतरपिकांची लागवड करावी. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध पाणी साठ्यामुळे शेतकरी फळबागा, चारापिके तसेच बागायती पिके घेण्याकडे वळत आहे. सर्वत्र पाणीसाठा असल्यामुळे यावर्षी उत्पादनात भरघोस वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. गव्हाच्या वाढीसाठी थंड, कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान आवश्‍यक असते. सध्याचा विचार करता वापशाअभावी गहू पिकाच्या पेरणीस उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीस प्राधान्य दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT