Shashikant Shinde esakal
सातारा

'राजकारणात हार-जीत होत असते, आता जावळीत अधिक लक्ष घालणार'

संदीप गाडवे

जावळीतील जनतेनं मला राज्याच्या राजकारणात मोठी ताकद दिली आहे.

केळघर (सातारा) : मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने पक्षाचा आदेश म्हणून मी कोरेगाव मतदारसंघात गेलो. मात्र, जावळीतील सामान्य जनतेने मला राज्याच्या राजकारणात मोठी ताकद दिली असून, तालुक्याचा सुपुत्र म्हणून जावळीत यापुढे अधिक लक्ष देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेढा, केळघर विभागातील ५४ गावांसाठी महत्त्‍वाचा बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बैठक घेण्याची ग्वाही आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी दिली. आपल्या आईने आपल्याला घडवले, संस्कार देऊन मोठे केल्याची जाणीव ठेवून वरोशीत गेल्या पाच वर्षांपासून विजयराव मोकाशी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आपल्या आईच्या नावे इंदुमती केशवराव मोकाशी पुरस्कार परिसरातील आदर्श मातांना देत असल्याचा उपक्रम आदर्शवत असल्याचे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

वरोशी येथे आदर्शमाता इंदुमती केशवराव मोकाशी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, अमित कदम, एकनाथ ओंबळे, संजय घोरपडे, सरपंच विलास शिर्के, बाबूराव कासुर्डे, हनुमंत शिंगटे, बुवासाहेब पिसाळ, साधू चिकणे, बाजीराव धनावडे, सुनील देशमुख, सुरेश कासुर्डे, सचिन बैलकर, जितेंद्र कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘आर. आर. पाटील हे ग्रामविकासमंत्री असताना सर्वप्रथम मी केडंबे येथे पाणी परिषद घेऊन बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मांडला होता. आमच्या हक्काचे सहा टक्के पाणी उपलब्ध असताना हे धरण का रखडले, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांना भेटून धरणाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून पाठपुरावा करणार आहे.

विधानसभा मतदारसंघ बदलला नसता तर धरण कृती समितीला आंदोलन करण्याची वेळ मी येऊ दिली नसती.’’ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला म्हणून काही जण आनंदाने नाचले. राजकारणात हार-जीत होत असते. ऐतिहासिक जावळीतील जनतेने मला मोठे केल्याची जाणीव ठेवून यापुढे जावळीतील प्रलंबित कामे पूर्ण करणार आहे. केळघर विभागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आणणार आहे.’’ या वेळी इंदुमती मोकाशी आदर्शमाता पुरस्कार लक्ष्मी तुकाराम कासुर्डे व लक्ष्मी विश्वास कासुर्डे यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. विजयराव मोकाशी यांनी स्वागत केले. विलास शिर्के यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT