सातारा

पंचायत समितीकडून प्रलंबित कामांना गती; प्रशासनाने कसली कंबर

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : सात महिने कोरोनामुळे स्थानकातच प्रशासनाचा गाडा थांबलेला आहे. आरोग्य, एकात्मिक बालविकास प्रकल्प, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाचे मुख्यालय सोडले तर संपूर्ण कामकाज ठप्प होते. पंचायत समिती प्रशासनाने मात्र अनलॉकचा फायदा घेत रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत विभागनिहाय आढावा बैठकांचा धडाका लावला असून, प्रलंबित कामांसाठी कंबर कसली आहे. 

हळूहळू लॉकडाउनच्या अटी शिथिल होत गेल्या असून, सर्वकाही पूर्वीसारखे पूर्वपदावर येत आहे. याचा विचार करून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी प्रलंबित कामांना गती देण्यासाठी कर्मचारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. कोविडमुळे कामकाजाबाबत टाळाटाळ करणारांना सक्रिय करून रुतलेला प्रशासनाचा गाडा रुळावर आणण्यासाठी नियोजन केले आहे. घरकुल, दलितवस्ती विकासकामे ज्यांचा निधी शिल्लक आहे, टेंडर झालेले नाही, वर्कऑर्डर झाली. परंतु, कामास सुरुवात नाही, अशा कामांची ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता यांना या बैठकांच्या माध्यमातून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रलंबित कामांना सुरुवात होऊ लागली असून, दिवाळीपूर्वी या कामांना दिशा मिळावी, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने कंबर कसली आहे. 

कोविडचे कारण देऊन अनेक कर्मचारी कामकाजात टाळाटाळ करीत होते. अनलॉक प्रक्रियेमुळे आता कारणे सांगता येणार नाहीत. निधी उपलब्ध असणारी, अपुरी व सुरुवात न झालेली कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करून कर्मचारी व अधिकारी यांना जबाबदारी दिली आहे. 

-मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाटण 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

Palghar News: भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग सात वर्षांपासून रखडला; आठ दिवसांत काम न झाल्यास...; प्रशासनाला थेट इशारा कुणी दिला?

Latest Marathi News Live Update : निर्यातीला मोठा धक्का! RoDTEP दरांमध्ये ५०% कपात

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT