Kas Pathar Satara esakal
सातारा

आता कास पठारावरील पर्यटन बारमाही सुरू राहणार? जीप सफारीतून पर्यटकांना अनुभवता येणार निसर्गाचा आविष्कार

जीप सफारीत बसून पर्यटक निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवत आहेत.

सूर्यकांत पवार

पर्यटकांनी कास पठारावरील दिसणारी निसर्गाचे रूपे तसेच रहस्यमय ठिकाणं पाहून समाधान व्यक्त केले.

कास : कास पठाराचा (Kas Pathar Satara) हंगाम संपल्यानंतर कास पठार कार्यकारी समितीमार्फत कास पठारावर निसर्ग पर्यटन सुरू करण्यात आले आहे. या निसर्ग पर्यटनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कासवरील पर्यटन बारमाही सुरू राहावे, यासाठी वन विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कास पठारावर असणारी निसर्गाची अद्‌भूत रूपे, गुहा, तळी तसेच काही रहस्यमय ठिकाणे पाहण्याची संधी पर्यटकांना कास पठार समिती आणि वन विभागाच्या (Forest Department) संयुक्त विद्यमाने निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी बऱ्याच पर्यटकांनी भेट देऊन कास पठारावरील दिसणारी निसर्गाचे रूपे तसेच रहस्यमय ठिकाणं पाहून समाधान व्यक्त केले. निसर्ग पर्यटनात सुरू केलेले पॉइंट पायी चालत अथवा जीप सफारीतून सुद्धा अनुभवू शकतो. जीप सफारीतून दिसणारी निसर्गाची अद्‌भूत सफर आणि त्यात दऱ्याखोऱ्याची माहिती असणारे अनुभवी गाइड यामुळे जीप सफारीत बसून पर्यटक निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT