सातारा

कोरोना चाचणी करणाऱ्यांचीच उघडणार दुकाने; पाटण तालुक्‍यात व्यावसायिकांना सक्त सूचना

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : दिवाळीत कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी पाटण तालुक्‍यातील लहान-मोठ्या बाजारपेठातील व्यापारी व विक्रेत्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहे. संबंधितांनी त्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जे चाचणी टाळतील त्यांना दुकाने उघडण्यास मज्जाव करण्याचा निर्णयही स्थानिक ग्रामपंचायतीनी घेतला आहे. 

पाटण तालुक्‍यात सध्या कोरोनाचा फैलाव नियंत्रणात असला, तरी मध्यंतरी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखे वातावरण होते. गेल्या सात महिन्यांत तालुक्‍यात 1783 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 106 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूची टक्केवारी थोडी जास्त दिसत असली, तरी काहींच्या मृत्यू पश्‍चात झालेल्या चाचण्यांचे आणि बाहेरगावाहून येथे येऊन अचानक मृत्युमुखी पडलेल्यांचे कारण त्यामागे जोडले जात आहे. तालुक्‍यातील अनेक लहान-मोठ्या बाजारपेठात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते. अनेक दिवस वारंवार बंद राहिलेल्या बाजारपेठा सध्या सुरळीतपणे सुरू झाल्या असल्या, तरी मध्यंतरी काही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झालेला कोरोनाचा फैलाव पाहाता दिवाळीत पुन्हा तसा धोका वाढू नये, यासाठी व्यापारी, भाजीपाला व फिरते विक्रेते, तसेच अन्य व्यावसायिक यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहे. 

तालुक्‍यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून त्याबाबतचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी लहानमोठ्या बाजारपेठांत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व व्यापारी, विक्रेत्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. जे चाचणी करून घेणार नाहीत, त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींनी दिल्या आहेत. संबंधित प्रत्येकास या तपासणी मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी व्यापारी व विविध व्यावसायिकांच्या संघटनांना कळविण्यात आले असून, कुणीही चाचणीविना राहू नये, यासाठी ग्रामपंचायतींकडून आधार कार्डची नोंदणीही सुरू आहे. दरम्यान, कोरोना चाचणीसाठी पुरेशा किट्‌स उपलब्ध असून, प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT