सातारा

SSC Result : सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : इयत्ता दहावीचा निकाल आज (बुधवार) शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. कोल्हापूर विभागातील सातारा जिल्ह्याचा निकाल 97.25 टक्के लागला आहे. या विभागातील कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 98.21 टक्के तसेच सांगली जिल्ह्याचा निकाल 97.22 टक्के लागला आहे.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावीचा निकाल जाहीर! विद्यार्थ्यांनो 'इथे' पहा निकाल

सातारा जिल्ह्यातील 39 हजार 784 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 38 हजार 688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अव्वल श्रेणीत 17 हजार 15, प्रथम श्रेणीत 13 हजार 543 तसेच द्वितीय श्रेणीत सहा हजार 828 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक हजार 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सातारा जिल्ह्याचा 97.25 टक्के निकाल लागला आहे.

या परीक्षेतील 38 हजार 688 उत्तीर्ण पैकी 20 हजार 323 मुले तसेच 18 हजार 365 मुलींचा समावेश आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 96.24 तसेच मुलींची 98.38 टक्के अशी आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याचा निकाल 98.21 टक्के, कऱ्हाड, 97.42, खंडाळा, 97.99, खटाव 97.65, कोरेगाव 96.92, माण 97.97, महाबळेश्‍वर 98.47, फलटण 94.56, पाटण 96.75, सातारा 97.62, वाई 98.26 इतका लागला आहे.

कोरेगावातील प्रथमेशच्या मुकुंद मिश्राने बनवलं लाखाे नेटकऱ्यांना भावुक

औरंगाबाद विभागातील मुलीच हुश्‍शार..! मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी ३.१ ने जास्त

नगर जिल्ह्यात दहावी निकालात मुलींची आघाडी

लातूर विभाग राज्यात सातव्या स्थानी, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.०९ टक्के निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

अदाणी समूह RCB चा संघ खरेदी करणार? 'या' चार कंपन्याही आहेत शर्यतीत...

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या वडाळा रोड येथील अशोक हॉस्पिटल परिसरात दोन गटात हाणामारी

'अल्पवयीन विवाहित मुलीशी लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच!' High Court चा ऐतिहासिक निर्णय, मुस्लिम वैयक्तिक कायदा फेटाळला

हृतिक रोशनच्या एक्स पत्नी सुझानला मातृशोक ! वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT