ST Bus esakal
सातारा

ST Strike: कऱ्हाडच्या 32 एसटी कर्मचाऱ्यांची बडतर्फी

यापुर्वी १८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी ही माहिती दिली.

हेमंत पवार

कऱ्हाड : येथील एसटी आगाराची गाडी अजुनही रुळावर आलेली नाही. अनेकदा कळवुनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने एसटी प्रशासनाने ३२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. त्याचबरोबर यापुर्वी १८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी ही माहिती दिली. (Satara ST Strike Updates)

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासुन आंदोलन सुरु आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढ जाहीर केली. त्यानंतर अनेकदा बैठका झाल्या. मध्यंतरी जेष्ठ नेते शरद पवार यांनीही बैठक घेवुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करुन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सांगतीले. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन सुरुच आहे.

त्यामुळे येथील एसटी आगाराच्या दैनंदिन फेऱ्यावर पर्यायाने उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. सध्या एसटी आगाराकडे दहा चालक आणि २९ वाहक हजर झाले आहेत. त्यांच्यामार्फत दररोज पुणे, मुंबई, ढेबेवाडी, शेडगेवाडी, चिपळुण, मिरज, सातारा, सांगली, कोल्हापुर

या मार्गावरील फक्त ५५ फेऱ्या होत आहेत. दरम्यान एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे सत्र सुरुच ठेवले आहे. सध्या ३२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वरी १८ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई कऱण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यत ५० कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. अजुनही काही जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अशी आमची विनंती आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यांनी कामावर आल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे त्यांनी बिनधास्त कामावर यावे.

-विजय मोरे आगार व्यवस्थापक, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT