satara sakal
सातारा

सातारा : एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एसटी महामंडळातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्यावा

हेमंत पवार

कऱ्हाड : एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांमार्फत (st employees)येथील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधिस्थळापासून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत(Azad Maidan) पदयात्रा काढण्यात येणार होती. त्यासाठी कर्मचारी प्रीतिसंगमावर आल्यावर पोलिसांनी पदयात्रेस प्रशासनाची परवानगी नसल्याने संबंधितांना ताब्यात घेतले. एसटी महामंडळातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्यावा, त्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊन विलीनीकरण करावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून संप सुरू आहे. त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे.त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपले काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे एसटीलाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. या विलीनीकरणाच्या लढ्यात आतापर्यंत ६५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आदरांजलीसाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांमार्फत आज सकाळी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधिस्थळापासून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार होती. त्यासाठी कर्मचारी प्रीतिसंगमावर आले होते. मात्र, त्यांना शासनाची परवानगी नसल्याने शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील, रवींद्र देशमुख, अमोल साळुंखे, उत्तम बर्गे यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणून नोटीस देऊन सोडण्यात आले. दरम्यान, प्रशासनाची परवानगी घेऊन पदयात्रा काढणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेचे संतोष पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत हा धमाल सिनेमा ! थाटात मुहूर्त संपन्न

SCROLL FOR NEXT