State Marketing Minister Balasaheb Patil. 
सातारा

सोयाबीनला यंदा शासनाचा तीन हजार 880 रुपये हमी भाव

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्य शासन सोयाबीनसाठी राज्यात तीन हजार 880 हमी भाव देणार आहे. येत्या 15 ऑक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिली. 

राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला हा पाऊस आताही सुरु आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा, यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जात आहेत. तरी शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर आपला माल विकावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

राज्यात अजूनही पाऊस पडत आहे, त्यामुळे सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढलेला सोयाबीन विक्रीची घाई करुन नये. सोयाबीनला राज्य शासनाने तीन हजार 880 रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून 15 ऑक्टोंबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: अमेरिका-इराणचा करार का मोडला? युद्ध पुन्हा पेटणार का? इराणच्या 'एवढ्या' ठिकाणांवर हल्ले

Vasai Heavy Rain : वसईमध्ये अतिवृष्टीचा तिसरा बळी; २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Pune Ring Road : भुयारी मार्ग, एचसीएमटीआर, रिंगरोड प्रकल्पासाठी पुणे वाहतूक समितीची स्थापना; राज्य शासनाकडून निर्णय जाहीर

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT