सातारा

फायनान्सच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू : बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्जवसुली चालवली आहे. ती तत्काळ थांबवण्यासाठी प्रांताधिकारी यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. दरम्यान, सक्तीची वसुली अशीच सुरू ठेवल्यास बळिराजा शेतकरी संघटना वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढेल, असा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे. 

निवेदनातील माहिती अशी, कोरोना आणि लॉकडाउनमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. सामान्य लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्‍कील झाले आहे. काही महिला बहिणींनी फायनान्स कंपन्यांकडून घरगुती कारणासाठी कर्ज घेतले आहे. कोरोनाचा संसर्ग नव्हता तेव्हा महिलांनी वेळेवर हप्ते भरले. मात्र, कोरोनामध्ये आर्थिक अडचण झाली. त्यामुळे त्यांना हप्ते भरता आले नाहीत. परिणामी फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. काही वसुली कर्मचारी महिलांना असभ्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी करत आहेत. अशी सक्तीची कर्जवसुली करणाऱ्यांना वेळीच चाप लावावा. 

राज्य शासनाने, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सक्तीची कर्जवसुली करू नका, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही सक्तीची कर्जवसुली सुरू आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. तत्पूर्वी मायक्रो फायनान्सचे अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष मुल्ला, कामगार नेते अनिल घराळ, उपाध्यक्ष सुनील कोळी, गणेश पवार, विनोद डुबल, संदीप लोंढे व महिलांनी प्रांताधिकारी दिघे यांच्याकडे केली. दरम्यान, कोरोनाचे संकट मोठे आहे. आयुक्तांनी सक्तीची कर्जवसुली करू नका, असे आदेश दिले असताना फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली सुरू आहे. अशीच वसुली सुरू राहिल्यास बळिराजा शेतकरी संघटना वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढेल, असा इशाराही मुल्ला यांनी दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT