Wai Taluka esakal
सातारा

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा; वाई संघटनेचे आमदारांना साकडे

सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीवर 2014 पासून बंदी

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन वाई तालुका बैल प्रेमी संघटनेच्या (Wai Taluka Association) वतीने आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांना देण्यात आले. निवेदनात बैलगाडी शर्यतीचा विषय केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाशी संबंधित आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाने प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार ११ जुलै २०११ रोजी बैल या पाळीव प्राण्याचा समावेश सरकारी राजपत्रात केला आहे. त्यामुळे बैलांचे प्रदर्शन व शर्यती बंद झाल्या आहेत. हा विषय पशुसंवर्धन मंत्रालयाकडे हस्तांतरित झाला आहे. या शर्यतीवरील बंदीचा विषय सोडविण्यासाठी मंत्रालयाने बैलांचा समावेश गॅझेटमधून काढून टाकणे गरजेचे आहे.

सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली आहे.

याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर ७ मे २०१४ पासून बंदी घातली आहे. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी बैलगाडी शर्यतीची परंपरा सुमारे ४०० वर्षांपासून जुनी आहे. ग्रामीण भागात देव-देवतांच्या यात्रांमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजिण्याची परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांनी बैलगाडी शर्यतीबाबत स्वतंत्र कायदा केला आहे. याच धर्तीवर बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये कायदा केला; परंतु कायद्यास मुंबईतील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या सुनावणी दरम्यान यापूर्वी सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली आहे, तरी लोकप्रतिनिधी या नात्याने या विषयात लक्ष घालून गोवंश वाचविण्याच्या दृष्टिकोनातून व या पारंपरिक खेळांना चालना मिळण्यासाठी राज्याच्या विधानसभेत हा विषय प्रकर्षाने मांडून याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तत्काळ घेण्याकरिता योग्य तो आवाज उठवावा, अशी विनंती तालुक्यातील सर्व बैलप्रेमी संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Love story Video : 'Hardik Pandya'चं नवं लफडं आलं बाहेर, टीम इंडियाच्या पेजवर एकमेकांना केली कमेंट; कोण आहे Mahieka Sharma?

Mumbai Crime: आधी अश्लील हावभाव, नंतर आरडाओरड करताच रिक्षातून बाहेर ढकलल अन्...; चालकाचं मुलीसोबत धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : उल्हासनगरात सराईत गुंडावर चाकू हल्ला, सीसीटीव्ही फुटेज आला समोर

Google Search Trends: 2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले 'हे' आजार, संपूर्ण लिस्ट एकदा पाहाच

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील ४ सामन्यांना स्टार फलंदाज मुकणार; प्रतिस्पर्धी संघाची झाली गोची... फ्रँचायझी लीगला महत्त्व

SCROLL FOR NEXT