सातारा

बोरगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवी मुंबईचा चोरीस गेलेला ट्रक परत

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : बोरगाव पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे खारघर (नवी मुंबई) येथून चोरीस गेलेला ट्रक पुन्हा मूळ मालकाला परत मिळाला. पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस निरीक्षक वर्षा डाळिंबकर, हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे, विजय साळुंखे, विशाल जाधव, किरण निकम हे भागात गस्त घालत होते. या वेळी नागठाणे (ता. सातारा) येथे महामार्गावर एक आयशर मालट्रक संशयास्पदरित्या उभा असलेला आढळला. पोलिसांनी चालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता चालकाने ती जवळच्या गॅरेजवर ठेवली आहेत, असे सांगितले. कागदपत्रे घेऊन येतो, असे सांगून तो चालक निघून गेला. बराच वेळ होऊनही चालक परत न आल्याने पोलिसांनी संबंधित ट्रक पोलिस ठाण्यात आणला. 

या ट्रकच्या केबीनची तपासणी केली असता पोलिसांना इन्फ्रा केमिकल प्रा. लि. कंपनीचे एक चलन सापडले. त्यावरून चौकशी केल्यावर हा ट्रक पाशा उस्मान शेख (रा. साईसदन सोसायटी, सेक्‍टर 19, मुर्बी गाव, खारघर, नवी मुंबई) यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. तो 12 ऑक्‍टोबरला तेथून चोरीस गेल्याची फिर्याद खारघर पोलिस ठाण्यात दाखल केली असल्याची माहितीही पुढे आली. चोरट्याने ट्रकची नंबरप्लेटही बदलली असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिसांनी मूळ मालकास बोरगाव ठाण्यात बोलावून ट्रक त्याच्या ताब्यात दिला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; अनेक तास अडकल्याने प्रवासी त्रस्त, पाच ते सहा किमी रांगा

DHURANDHAR COLLECTION: धुरंधरने केली बक्कळ कमाई! आतापर्यंतचं कलेक्शन वाचून थक्क व्हाल!

Truck Tempo Accident: पाथरी-पोखर्णी रस्त्यावरील अपघातात ट्रकचालक ठार; ट्रक टेंम्पो ट्रेलरची धडक, दोन तास वाहतूक ठप्प

Kolhapur Pregnant Woman : गोव्यातून बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या गर्भवतीचा मृतदेह रंकाळ्यात आढळला, हृदयद्रावक घटना!

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT