strike for PM Gharkul scheme in Karad over not getting home  Sakal
सातारा

PM Gharkul Scheme : प्रधानमंत्री घरकुलासाठी कऱ्हाडमध्ये मोर्चा

दहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थी वंचित; संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : प्रधानमंत्री घरकुल योजनेतून अद्यापही घरे मिळालेली नाहीत. ती द्यावीत, या मागणीसाठी कऱ्हाड तालुका घरकुल संघर्ष समितीतर्फे येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने २०१८ मध्ये गावोगावी सर्व्हे करून घरांची आवश्यकता आहे, त्या गरजू आणि पात्र लोकांची यादी तयार केली.

त्याला ग्रामसभेची मान्यता घेतली. शासनाचीही त्या यादीला मान्यता मिळाली. सहा वर्षांमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकेच लाभार्थींना घरकुलचा लाभ झाला आहे. उर्वरित अद्यापही वंचित आहेत.

त्यांना निधी मिळावा, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. तालुक्यात १० हजारपेक्षा जास्त पात्र लाभार्थींना घरकुलचा लाभ मिळालेला नाही, त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही.

त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्त चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.

तालुक्यातील पात्र व गरजू घरकुलची यादी २०१८ मध्ये मंजूर केली असतानाही त्यांना कोणताच लाभ दिलेला नाही. सहा वर्षे नारिकांना प्रतीक्षा आहे. अनेकांची घरांची पडझड झाली आहे. काही जण जीव मुठीत जगत आहेत.

त्याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे म्हणून कऱ्हाड तालुका घरकुल संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढला. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा ः घरकुलाला एक लाख ५० हजारऐवजी तीन लाखांचा निधी द्यावा,

ज्यांची नावे घरकुल प्रत्यक्ष यादी असूनही सहा वर्षे घरकुल न मिळाल्याने बँकेसह खासगी कर्जे घेऊन घर बांधलेल्यांना शासनाने पूर्ण निधी द्यावा. ज्या लाभार्थ्यांना जागा नाही, मात्र त्यांची नावे घरकुल यादीत त्यांना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

Latest Marathi News Live Update : विठ्ठल-रुक्मिणी पूजेची बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

SCROLL FOR NEXT