सातारा

शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट; कऱ्हाडला एसटीअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू केली. ती सुरूही झाली. मात्र, त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने आवश्‍यक तेवढ्या एसटी बसची सोय केलेली नाही. त्यामुळे त्यांना चालत शाळा-महाविद्यालये गाठावी लागत आहेत. शहरातून दररोज शेकडो विद्यार्थी एसटी बसअभावी पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने पाहण्याची वेळ आली आहे. 

कऱ्हाडला विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. येथे राज्यातील पहिले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केले. त्याचबरोबर विविध प्रकारची शासकीय महाविद्यालये, खासगी महाविद्यालये विद्यानगरीत आहेत. त्याव्दारे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ते कऱ्हाडमधून विद्यानगरला दररोज ये-जा करतात. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यादरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, त्यावरही मर्यादा येऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी शासनाने दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतची शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाळा-महाविद्यालये सुरूही झाली आहेत. 

त्याला पहिल्याएवढा प्रतिसाद मिळत नसला तरी ती सुरू आहेत. त्यासाठी शेकडो विद्यार्थी दररोज शाळा-महाविद्यालयांत येथून ये-जा करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी पहाटेपासूनच शिक्षणास येण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना आवश्‍यक तेवढ्या बस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि एसटी बस हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या अशी स्थिती आहे. परिणामी दररोज विद्यार्थ्यांना पाच ते सहा किलोमीटर चालत ये-जा करावी लागत आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची ही पायपीट सुरू आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. यात त्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनानेच आता याकडे लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे. 

दररोज बसतोय आर्थिक भुर्दंड 

ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, ते विद्यार्थी एसटी बस मिळत नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करून महाविद्यालय गाठतात. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना ते शक्‍य होत नाही. जे विद्यार्थी खासगी वाहनाने जात आहेत, त्यांना दररोज पदरमोड करून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यांना ही आर्थिक झळ आता डोईजड झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT