सातारा

शिष्यवृत्ती परीक्षेत 952 विद्यार्थ्यांचे यश; कऱ्हाडसह सातारा तालुका अव्वल

प्रशांत घाडगे

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातून पाचवीचे आठ हजार 243 विद्यार्थी, तर आठवीचे तीन हजार 689 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील पाचवीच्या 474, तर आठवीच्या 478 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
 
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल ऑक्‍टोबर महिन्यात जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून पाचवीचे 21 हजार 175 विद्यार्थी बसले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचा 38.93 टक्के निकाल लागला आहे, तर आठवीचे 15 हजार 203 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचा 24.26 टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत पाचवीचे 38 विद्यार्थी, तर आठवीचे 39 विद्यार्थी राज्य शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

Diwali Festival 2020 दीपोत्सवाने उजळला दुर्गेश्वर सज्जनगड; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी!

याचबरोबर जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुक्‍यात सर्वात जास्त 84 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे, तर आठवीसाठी सातारा तालुक्‍यात सर्वात जास्त 98 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर आसन क्रमांक टाकून पाहता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT