सातारा

26 विद्यार्थी पॉझिटिव्ह येऊन सुद्धा मुख्याध्यापिका डगमगली नाही; कोरोनाची साखळी ताेडण्यात झाली यशस्वी

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा)  : येथील श्री सेवागिरी विद्यालयाने केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेतील कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी मदत झाली. शाळेच्या उपायांमुळे पुसेगाव व परिसरात होणारा प्रसार रोखता आला, अशा प्रतिक्रिया मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली. या शाळेतील 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शाळेने त्वरित काही उपाययोजना केल्या. चौगुले व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. 

कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना आधार देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले, असेही त्यांनी सांगितले. एक विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना फोन करून विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याविषयी शाळा आग्रही राहिली. सर्व विद्यार्थ्यांना घरात विलगीकरण करण्याचे आवाहन केले. ज्या विद्यार्थ्यांची घरे लहान होती, त्यांचे आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण करण्यात आले. शिक्षक व कर्मचारी सलग आठ दिवस विद्यार्थ्यांसाठी दवाखान्यात राहिले व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. विलगीकरण कक्षातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके तसेच फळे व जेवण पोचविण्यात आले. श्रीमती चौगुले यांनी शिक्षकांसोबत बाधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सुरक्षित अंतराचे पालन करत त्यांना प्रत्यक्ष भेटून नैतिक व मानसिक आधार दिला.
 
प्रत्येक बाधित विद्यार्थ्याच्या घरातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत शिक्षकांमार्फत पाठपुरावा करण्यात आला. या उपायांच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने अपार मेहनत घेतल्याने विद्यार्थ्यांमुळे बाधित होणाऱ्या पालकांची संख्या केवळ दोनपर्यंत रोखली गेली. 


शाखाप्रमुख या नात्याने घेतलेला योग्य वेळी योग्य निर्णय आणि शिक्षकांकडून त्याची कठोर अंमलबजावणी झाल्यामुळे शाळेतील कोरोना प्रादुर्भावाची साखळी काही दिवसांतच खंडित झाली. 

- संध्या चौगुले, मुख्याध्यापिका, सेवागिरी विद्यालय, पुसेगाव 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT