Undale Dam esakal
सातारा

चक्कर येऊन पडलेल्या पिता-पुत्राचा धरणात उडी घेऊन वाचवला 'जीव'

जगन्नाथ माळी

दुचाकीवरून जाताना चक्कर येऊन धरणात पडलेल्या पिता पुत्राला वाचविण्यात यश आले.

उंडाळे (सातारा) : दुचाकीवरून जाताना चक्कर येऊन धरणात (Undale Dam) पडलेल्या पिता पुत्राला वाचविण्यात यश आले. येथील बंधाऱ्यावर काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पितापुत्राचा सुधीर रामचंद्र पाटील यांनी धरणात उडी घेऊन जीव वाचविला. त्यामुळे सुधीर पाटील यांचे कौतुक होत आहे. सुनील महादेव पाटील व त्यांचा मुलगा अथर्व (दोघे रा. येळगाव) असे जीव वाचलेल्या पितापुत्राची नावे आहेत.

दुपारची साडेतीनच्या सुमारास येळगाव येथील सुनील पाटील हे आपला मुलगा अथर्वला घेऊन दुचाकीवरून उंडाळ्याकडून येळगावला निघाले होते. उंडाळे धरणावरील पुलावरून जाताना सुनील पाटील यांना चक्कर आली. वेगात ते गाडीसह धरणात पडले. देशीबन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी त्यांना धरणात पडताना पाहिले.

त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत क्षणाचाही विलंब न करता अंगावरील कापड्यासह पाण्यात उडी टाकून त्या पितापुत्राला पाण्यातून बाहेर काढले. अनेकांनी मोबाईल काढून त्याचे चित्रीकरण केले; पण सुधीर यांनी मोबाईलसह पाण्यात उडी मारून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला. दिवाळीच्या दिवशी नवीन कापड्यासह खिशातील मोबाईलचा विचार न करता पाण्यात उडी टाकून जी तत्परता व माणुसकीचे दर्शन घडवून पिता पुत्राचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT