सातारा

अथणी- रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा दिला जादा दर; शेतकरी समाधानी

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : शेवाळेवाडी- म्हासोली येथील अथणी- रयत साखर कारखान्याने यंदाचे 16 ते 31 जानेवारी अशा पंधरवड्यातील गळीत केलेल्या उसाचे प्रतिमेट्रिक टन दोन हजार 900 रुपयांप्रमाणे ऊसबिल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहे, अशी माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक योगेश पाटील यांनी दिली. "रयत'चे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख उपस्थित होते.
 
अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात आजअखेर 116 दिवसांत तीन लाख 55 हजार 420 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी 12.02 टक्‍क्‍यांनी साखर उतारा राखला आहे. चार लाख 22 हजार 270 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास, शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन या गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफआरपी दोन हजार 867 रुपये असताना त्यापेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. 

यापुढेही उसाला वेळेवर आणि चांगला दर देण्याची भूमिका अथणी शुगर्सची असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. यंदासाठी निश्‍चित केलेल्या पाच लाख मेट्रिक टन गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT