सातारा

नांदोशी पुलानजीक उसाच्या दाेन ट्रॉली पलटी; टेम्पो चालक जखमी

शशिकांत धुमाळ

औंध (जि. सातारा) : औंध-घाटमाथा रोडवर नांदोशी पुलानजीक औंधवरून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्‍टरने औंधकडे येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये टेम्पोचालक जखमी झाला असून टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
 
औंधवरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर (क्र. एम. एच. 23 एच. 8631) हा घाटमाथ्याकडे चालला होता, तर कऱ्हाडहून औंधमार्गे सिद्धेश्वर कुरोलीला माल घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. 11 एम. 4582) निघाला होता. नांदोशी पुलानजीक आल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्‍टरने सरळ टेम्पोला धडक दिली. त्याचवेळी उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या.

कास, ठोसेघरला दिवाळीनंतर भेट देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 

या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन त्यातून काही मालही रस्त्यावर पडला. टेम्पोचालक आजमुद्दीन पटेल (रा. वाघेरी) यांनी औंध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
 


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT