सातारा

भाजपच्या सुनील काळेकरांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी आज (ता. २१) भाजपच्या कोट्यातून सुनील काळेकर यांची निवड करण्यात आली. निवडीची औपचारिकता पार पडल्यानंतर काळेकर यांचा नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. 

भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठीचा निवडणूक कार्यक्रम प्रांताधिकारी मीनाज मुल्ला यांनी जाहीर केला होता. यानुसार काल भाजपच्या वतीने सुनील काळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने काळेकर यांच्या निवडीची औपचारिकता बाकी उरली होती.

बुधवारी या निवडीची औपचारिकता पार पाडण्यासाठी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेनुसार सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी काळेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर पालिकेच्या वतीने काळेकर यांचा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, सिध्दी पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT