Corona Vaccination esakal
सातारा

'कोरोना लस न घेणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार नाकारा'

गिरीश चव्हाण

कोरोनाचा कहर कमी होत असला तरी त्‍या प्रमाणात लसीकरण झालेले नाही.

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होत असला तरी त्‍या प्रमाणात लसीकरण (Corona Vaccination) झालेले नाही. आगामी काळात विविध स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका (Local Body Election) असून, या वेळी लस न घेणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्‍याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे (Social worker Sushant More) यांनी पत्रकाव्‍दारे केली आहे. याबाबतचे निवेदन ते जिल्‍हाधिकारी कार्यालयास देणार आहेत.

मोरे यांनी पत्रकात म्‍हटले आहे की, कोरोनाने मानवाचे अस्तित्व संकटात आले असताना प्रतिबंधक लसीकरणामुळे तो धोका कमी झाला आहे. लसीकरणामुळे किमान मृत्‍यूदर कमी येत असल्याने देशभरात शासनाने मोठ्या प्रमाणावर आरोग्य आणि अन्य यंत्रणेच्या साह्याने लसीकरणाचे दिव्य लीलया पेलले आहे. तरीही अनेकांनी लसीकरण करून घेतलेले नाही.

सध्या सहज लस उपलब्ध होत असून त्यासाठी सतत प्रबोधन केले जाते. तरीही अजूनही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. यासाठी आगामी जिल्हा बँक, नगरपालिका, नगरपरिषद, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीत लस घेतली तरच मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे धोरण शासनाने आखण्‍याची गरज असल्‍याचे मत मोरे यांनी पत्रकात व्‍यक्‍त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT