सातारा

कोरोनासंशयित ठोकताहेत धूम!, पोलिसांसह आरोग्य खात्याची पळापळ

विलास साळूंखे

भुईंज (जि.सातारा) : वाई तालुक्‍यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणीसाठी पाठविण्यात येणारे रुग्ण कोविड सेंटरमध्ये न जाता परस्पर परगावी पलायन करत असल्याने पोलिस, प्रशासन व आरोग्य विभागाची पळापळ होताना दिसत आहे. कोरोना संसर्ग वाढण्यात नागरिकांची निष्क्रियता अंगलट येत आहे.
उज्ज्वला मोटेंना भला माणूस पुरस्कार
 
मागील चार ते पाच महिन्यांपासून शासकीय यंत्रणा वारंवार कोरोना संसर्ग रोखण्याबाबत नागरिकांना सूचना करत आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन केले नाही, तर ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगत असतानाही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने ही वेळ आता येऊन ठेपली आहे. तालुक्‍यातील भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गावांपैकी भुईंजची रुग्णसंख्या एकूण 49 झाली असून, त्यापैकी 11 जण उपचार घेत आहेत. पाचवडमध्ये 37 रुग्णसंख्या असून, अजून सात जण उपचार घेत आहेत. जांबमध्ये आतापर्यंत एकूण 26 रुग्णसंख्या झाली असून, 12 जण अजून उपचार घेत आहेत. उडतरे येथे एकूण 43 रुग्णसंख्या असून, 18 जण उपचार घेत आहेत.

दुप्पट शेती उत्पादनासाठी शासनाचे पाऊल, 407 शेतकरी गटांना साडेसोळा कोटी 
 
देगाव येथे एकूण 11 रुग्णसंख्या असून, तीन जण उपचार घेत आहेत. यापैकी भुईंज, असले, उडतरे, अमृतवाडी येथील प्रत्येकी गावात कोरोना रुग्ण मृत झाला आहे. या परिसरातील रुग्णांची संख्या एकूण 190 झाली असून, द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. एकूण प्रशासनाचा दबाव या परिसरावर नसल्याने संसर्गिक रुग्णांची संख्या सुसाट होत आहे. एखादा कोरोनाचा रुग्ण जर मृत्युमुखी पडला, तर त्याचा अंत्यविधी कसा करायचा याचा एक प्रोटोकॉल आहे. मात्र, तोही कुठे पाळला जात नाही. आज भयानक परिस्थिती या ग्रामीण भागात झालेली असून, जनता भयभीत झाली आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून साताऱ्यातील गर्भवतींसाठी दाेन काेटी 74 लाखांचा निधी

कोणीही नागरिक भीतीपोटी तपासणी करण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर ती सरकारी यंत्रणेकडे जाऊन सेवा घेण्यास तयार नाही, तर ज्यांना तपासण्या करायच्या आहेत, त्यांची प्रतीक्षा यादी दोन ते तीन दिवसांनी येत आहे. तोपर्यंत रुग्ण परगावी जात आहेत. त्यांचा पुन्हा ठावठिकाणा मिळत नसल्याने आरोग्य खात्याची रुग्ण शोधण्यासाठी पळापळ होत आहे. नागरिकांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे या परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. 

आम्हांला हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु करु द्या : सातारा टुरिझम असोसिएशन

इतर संसर्गिक रुग्णांकडे दुर्लक्ष
 
कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर संसर्गिक रुग्णांकडे दुर्लक्ष होत असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर रुग्णांवरही उपचार करणे गरजेचे असल्याचे रुग्ण व नागरिकांचे म्हणणे आहे.

कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

Latest Marathi News Update : उध्दव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही - उद्धव ठाकरे

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

SCROLL FOR NEXT