सातारा

एकरकमी एफआरपीचे कारखान्यांना आदेश देऊ ; अजित पवारांचे 'स्वाभिमानी'ला आश्वासन

हेमंत पवार

कऱ्हाड/शिरवडे : एकरकमी एफआरपी देण्याचा कायदाच असल्याने ती देण्याबाबत कारखान्यांना आदेश देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन वीजबिल माफीसाठी 60 हजार कोटी अपेक्षित आहेत. रक्कम मोठी असल्याने संपूर्ण माफी शक्‍य नाही. मात्र, काहीअंशी माफीसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
 
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने करून निवेदन देऊन शासनाने आश्वासने देऊनही चालढकल होत असल्याने स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेमार्फत तीन दिवस पोवई नाका ते कऱ्हाडमधील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळापर्यंत स्वाभिमानी शेतकरी बचाव, शेतकरी आक्रोश पायी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर तो स्थगित करण्यात आला. बुधवारी (ता.25) समाधीस्थळी अभिवादनासाठी येणारे मंत्री यांच्याशी याप्रश्नी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. 

त्यानुसार स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी यांच्या वतीने संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, दक्षिणचे बापुसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान तातडीने देण्यात यावे, लॉकडाउन कालावधीतील घरगुती, व्यावसायिक व शेती वीजबिल संपूर्ण माफ करण्यात यावे, एकरकमी एफआरपी द्यावी व न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, दुधास पाच रुपये अनुदान द्यावे, केंद्र सरकारने लागू केलेली शेतकरीविरोधी धोरणे राज्यशासनाने लागू करू नयेत, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

अजमल कसाबला जिवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेंचे स्मारक आजही दुर्लक्षितच

या वेळी सहकारमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सुनील माने आदी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर श्री. पवार म्हणाले, ""सानुग्रह अनुदान तातडीने देण्यात येईल. एकरकमी एफआरपी देण्याचा कायदाच असल्याने ती देण्याबाबत कारखान्यांना आदेश देत आहोत. वीजबिल माफीसाठी जवळपास साठ हजार कोटी अपेक्षित आहेत. रक्कम मोठी असल्याने संपूर्ण माफी शक्‍य नाही. मात्र, काहीअंशी माफीसाठी प्रयत्न केले जातील.''

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT