सातारा

माणमध्ये नळजोडणी उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा; संतोष धोत्रेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : जलजीवन मिशन अंतर्गत माण तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व कुटुंबांना, तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले. 

माण पंचायत समितीच्या येथील कार्यालयात आयोजित जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठकीत श्री. धोत्रे बोलत होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमुते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता व पंचायत समिती माणचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

श्री. धोत्रे म्हणाले, ""जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र कार्यालय, तसेच कुटुंबांना जोडणी उद्दिष्ट माहे मार्चअखेर 100 टक्के पूर्ण करावे. तसेच नवीन वाढीव कुटुंबांचे वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे. सर्व ग्रामपंचायतींनी घनकचरा सांडपाणी अंतर्गत 100 टक्के शोषखड्डा मोहीम राबवावी. नवीन सार्वजनिक शौचालय प्रस्ताव सादर करावेत.'' किरण सायमुते यांनी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्व योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत राबवून ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. सर्जेराव पाटील व सुनील शिंदे यांनी सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी हृदयनाथ भोईटे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT