Talbid Women Decision
Talbid Women Decision sakal
सातारा

Alcohol and DJ Ban : बाटली आडवी आणि डिजे बंद! साताऱ्यातील महिला ग्रामस्थांचा दारूबंदी सोबत कौतुकास्पद निर्णय

सकाळ वृत्तसेवा

तळबीड (ता. कऱ्हाड) येथील ग्रामसभेत गावात अवैध दारूविक्री बंद करावी, तसेच गाव डीजेमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला.

वहागाव - तळबीड (ता. कऱ्हाड) येथील ग्रामसभेत गावात अवैध दारूविक्री बंद करावी, तसेच गाव डीजेमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. हे दोन्ही ठराव महिला व ग्रामस्थांनी हात उंचावून बहुमताने मंजूर केले. तळबीड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

तळबीडच्या सरपंच मृणालिनी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी सुनील ढाणे यांनी प्रोसिडिंगचे वाचन केले. त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी गावात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्री व विविध सण, समारंभात मोठमोठ्या आवाजाने लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे गावातील आबालवृद्धांना, ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला.

त्या वेळी या दोन्हींबाबतच्या निर्णयासाठी हात उंचावून मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी गावात अवैधरीत्या होणारी दारूविक्री बंद करणे तसेच गाव डीजेमुक्त करण्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. तसेच ग्रामसभेचे नियम मोडणाऱ्यांना दहा हजार रुपये आर्थिक दंडासह योग्य ती कायदेशीर कारवाई होण्यासाठी हे दोन्ही ठराव महिला व ग्रामस्थांनी हात उंचावून मत नोंदवीत बहुमताने मंजूर केले.

ग्रामसभेस सरपंच मोहिते यांच्यासह, उपसरपंच वैशाली पाडळे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, ग्रामपंचायत सदस्य विशाल मोहिते, अमोल लोहार, रमेश जाधव, दादासाहेब मोहिते, अनिल वाघमारे, सुभाष रकटे, संगीता मोहिते, रेखा माने, इंदूबाई शिंदे, वंदना वाघमारे, सविता कुंभार, साधना वाघमारे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच या ग्रामसभेच्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड व योग्य ती कायदेशीर कारवाई होण्यासाठी ठरावाच्या प्रती तळबीड पोलिसांना देण्याचा या वेळी निर्णय घेण्यात आला. सुनील ढाणे यांनी प्रास्ताविक केले. विशाल मोहिते यांनी आभार मानले. दरम्यान, तळबीड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT