Ashadhi Wari  sakal
सातारा

Ashadhi Wari : रिंगण सोहळ्याने चैतन्याचा संचार;भाविकांची अलोट गर्दी,माऊलींच्या अश्वांची दौड

टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... ज्ञानोबा-माऊलीचा अखंड जयघोष... देहभान विसरून नाचणारे वारकरी... भाविकांची अलोट गर्दी... अश्वांनी बेफान दौड सुरू करताच वरुणराजाने लावलेली हजेरी आणि वैष्णवांच्या मांदियाळीच्या आनंदाला आलेले उधाण असा नेत्रदीपक सोहळा सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

विलास काटे

तरडगाव : टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... ज्ञानोबा-माऊलीचा अखंड जयघोष... देहभान विसरून नाचणारे वारकरी... भाविकांची अलोट गर्दी... अश्वांनी बेफान दौड सुरू करताच वरुणराजाने लावलेली हजेरी आणि वैष्णवांच्या मांदियाळीच्या आनंदाला आलेले उधाण असा नेत्रदीपक सोहळा सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाला. ओसंडून वाहणाऱ्या भक्तिरसात अश्वांनी रंगविलेल्या रिंगणाने लाखो भाविक चिंब झाले.

लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींचा पालखी सोहळा दुपारी दीडच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकरांनी पालखी रथात ठेवली. बाजारपेठेतून सोहळा जाताना भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा जाणवत होता. अनेक वारकऱ्यांनी सकाळपासून चांदोबाच्या लिंबाजवळ गर्दी केली होती. अनेकांनी रिंगणाच्या परिसरात मिळेल तिथे विश्रांती घेतली. दरम्यान पालखीच्या वाटचालीत दोन वेळा पावसाचा शिडकावा झाला.

त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्य होते. सव्वातीनच्या सुमारास चांदोबाच्या लिंबजवळ अश्वांचे आगमन झाले. साडेतीनच्या सुमारास माऊलींचा रथ चांदोबाच्या लिंबच्या मंदिराजवळ आला. फलटण, लोणंद पंचक्रोशीतील भाविक रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी करून उभे होते. सायंकाळी चारच्या सुमारास उभ्या रिंगणाला प्रारंभ झाला. बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार यांनी रिंगण लावले. रथात अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे होते. तर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ रिंगणात उपस्थित होते.

रिंगण लावताच रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत रथापुढील २७ व्या दिंडीपासून दोन्ही अश्वांना रिंगणात सोडण्यात आले. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वाराचा अश्व बेफाम वेगात रिंगणात धावले. अश्व धावू लागताच वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. पण, एकाही वारकरी वा भाविकाने जागा सोडली नाही. भिजतच ‘माऊली-माऊली’ अखंड गजर सुरू होता. अश्व रथाच्या उजव्या बाजूने मागील काही दिंड्यांपर्यंत जाऊन पुन्हा फिरून रथाजवळ आला.

अश्वांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेथे राजेंद्र उमाप यांनी अश्वांना हार घातला आणि प्रसाद दिला. त्यानंतर रथापुढे अश्वांची दौड सुरू झाली. बेफाम दौड घेत स्वाराच्या आणि माऊलींच्या अश्वाने एकामागे एक धावत रिंगण पूर्ण केले. चिंब पावसातही भाविकांनी अश्वांच्या टापांखालील चिखलाला स्पर्श करून नमस्कार केला. आरतीनंतर माऊलींचा सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. रात्री सोहळा तरडगावात मुक्कामी थांबला. मंगळवारी (ता. ९) पालखी सोहळा फलटण मुक्कामी पोचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT