सातारा

ट्रॅक्‍टरखाली चिरडलेल्याचा तहसीलदारांनी वाचविला जीव; एक ठार

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : संध्याकाळच्या पाचची वेळ... जाशीकडे निघालेला ट्रॅक्‍टर गोंदवले खुर्दजवळ नदीवरील पुलावरून खाली कोसळला... एक जण गारद झालेला. याचवेळी कामानिमित्त निघालेल्या तहसीलदार बाई माने घटनास्थळी पोचल्या. जखमीला आपल्याच वाहनात घेऊन रुग्णालय गाठले अन्‌ एक जीव वाचविण्यात यश आले. गोंदवले खुर्द हद्दीतील चव्हाणवस्ती जवळ माण नदीवरील पुलावर शनिवारी संध्याकाळी हा अपघात झाला. पाचच्या सुमारास जाशीकडे निघालेला ट्रॅक्‍टर हा ट्रॉलीसह या पुलावरून थेट नदीपत्रात कोसळला. या वेळी गुलाब सुभाष सावंत व विजय मोहन वणवे हे दोघेही ट्रॅक्‍टरखाली चिरडले गेले. यामध्ये गुलाब वणवे वय (28) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सावंत गंभीर जखमी झाले.

अपघाताच्या मोठ्या आवाजाने परिसरातील लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ट्रॅक्‍टरखालून काढण्यासाठी जवळच काम करत असलेला जेसीबी बोलविण्यात आला. जखमीला बाहेर काढले; पण आता दवाखान्यात न्यायचे कोणी आणि कसे? हा प्रश्न होताच. याच दरम्यान कामानिमित्त जाशीकडे निघालेल्या माणच्या तहसीलदार घटनास्थळी पोचल्या. त्यांनी अपघाताची पाहणी केली. एक जण तर मृत झालाच होता; परंतु गंभीर जखमीचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी तातडीने हालचाली केल्या.

मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा 

तहसीलदार माने यांनी महसूलचे सागर देशमुख, चालक संतोष पंडित, तसेच वस्तीवरील स्नेहलसिंह चव्हाण, माऊली चव्हाण, दादा चव्हाण, विश्वजित चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण यांच्या मदतीने जखमीला स्वतःच्या वाहनातून थेट दहिवडीचे ग्रामीण रुग्णालय गाठले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही जखमीवर तत्काळ उपचार सुरू केले अन्‌ काही वेळातच जखमीच्या जीवावरचा धोका टळला. दरम्यान, तहसीलदार माने यांनी अपघातग्रस्ताला तातडीने दवाखान्यात दाखल करून अधिकाऱ्यातील माणुसकीचे दर्शन दिले.

शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT