सातारा

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तेजस्वी सातपुतेंनी चढविले पीपीई कीट

भद्रेश भाटे

वाई (जि.सातारा) : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये अनेक डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी सलग पाच- सहा तास पीपीई किट्स घालून कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करीत आहेत. अशाप्रकारे पीपीई किट घालून रुग्णसेवा बजावणे अतिशय अवघड काम आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी करीत असलेली रुग्णसेवा ही निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे असे काैतुक सातारा जिल्ह्याच्या पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी ट्विट करुन केले आहे.
सातारा : दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; 89 रुग्णांची वाढ  

वाई पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांसह अन्य १२ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांवर येथील डॉ. घोटवडेकर हॉस्पिटल व संचित आय सी यु च्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी नुकतीच या रुग्णालयात जाऊन कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली. संबंधित रुग्णांना काळजी करु नका तुम्ही लवकरच ठणठणीत व्हाल तसेच तुमच्या कुटुंबियांसमवेत आम्ही आहाेत असा दिलासा दिला. त्यावेळी सुरक्षिततेसाठी त्यांनी एक तास पीपीई किट घातले होते. या वेळी आलेल्या अनुभवातून त्यांनी ट्विटरवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संपादन - सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : गुंड अभिनंदन झेंडेवरील हल्ल्याप्रकरणी अमीर शेखला अटक 

प्राणीप्रेमींनाे तुम्हीही हे नक्की करा; पाचगणीत रोटरी क्‍लबचा स्तुत्य उपक्रम

एक दाेन नव्हे तेरा पाेलिस कोरोनाबाधित झाल्याने एसपी तेजस्वी सातपुतेंनी उचलले हे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT