JayKumar Gore sakal media
सातारा

जिहे- कठापूर उपसा योजनेच्या निविदा

आमदार जयकुमार गोरे; रखडलेली कामे मार्गी लागणार असल्याने माण, खटावमध्ये आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा

बिजवडी - गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांच्या हेतूपुरस्कर रखडविलेल्या निविदा त्वरित काढाव्यात, या मागणीचे पत्र आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर तात्काळ आदेश निघून या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मागील सरकारच्या कार्यकाळात रखडलेली या योजनेची कामे आता मार्गी लागणार असल्याने माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उरमोडीचे खरीप आवर्तन सोडण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याने खटाव, माणमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘लक्ष्मणराव इनामदार जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे ६७ गावांमधील २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून सतत प्रयत्न करून या योजनेच्या कामांना मी लागेल तितका निधी उपलब्ध करून घेतला. वाढीव खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली. सध्या या योजनेची बॅरेज, पंपगृह, बोगदे, विद्युत आणि यांत्रिकी कामे पूर्ण होऊन एका नलिकेद्वारे पाणी खटावमधील नेर तलावात सोडण्यात येत आहे. हे पाणी पुढे आंधळी धरणात आणि नंतर माण नदीत सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी दुसरी नलिका, आंधळी उपसा सिंचन आणि वितरण व्यवस्थेची कामे त्वरित होणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कामांच्या निविदा न निघाल्याने योजना पूर्ण झाली नाही. रखडलेल्या कामांच्या निविदा काढाव्यात, यासाठी मी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, जुन्या कामांच्या निविदा स्थगित करण्यात आल्या.’’

या योजनेची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी उर्वरित सर्व कामांच्या निविदा तत्काळ काढाव्यात, या मागणीचे पत्र मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभागाला आदेश दिले आणि या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. आता जिहे-कठापूर योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण होऊन खटाव, माण आणि माण तालुक्याच्या उत्तर भागाला पाणी देण्याचा मी दिलेला शब्द पूर्ण होणार आहे.’’

उरमोडीचे खरीप आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा

सध्या उरमोडी धरणातून खरीप आवर्तन सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातून होत आहे. त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. तशी मागणी आमदार गोरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन जलसंपदा विभागाला बैठक आयोजित करून उरमोडीचे आवर्तन खटाव आणि माण तालुक्यांतील लाभक्षेत्रासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागात उरमोडीचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT