Thackerays Nishta Yatra sponsored by NCP Shambhuraj Desais counterattac Shiv Sena warns Home Minister Shambhuraj Desai
सातारा

ठाकरेंची निष्ठा यात्रा राष्ट्रवादी पुरस्कृत

शंभुराज देसाईंचा पलटवार

अरुण गुरव

मोरगिरी - आमदार आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होती. पाटण तालुक्यातील पारंपारिक विरोधक राष्ट्रवादीला मानणारे गाड्याच्या गाड्या भरून ठाकरेंच्या सभेला आले होते. निष्ठा यात्रेच्या निमित्ताने एका दिवसापुरता का होईना‌ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटाच्या लोकांच्या गळ्यात आम्हाला भगवा गमजा बघायला मिळाला. सभेच्या गर्दीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर गर्दी जमवण्यात आली होती, असा पलटवार आमदार शंभुराज देसाई यांनी आज केला.

आमदार देसाई म्हणाले, आदित्य ठाकरे यांना दाखवण्यापुरतीच गर्दी जमवण्यात आली होती. त्यांना पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते. त्याचा मी फारसा विचार करत नाही. सभेत काही वक्ते माझ्यावरती वैयक्तिक बोलले. त्यापैकी माजी आमदार दगडूदादा सपकाळ म्हणाले की मी पुन्हा निवडून येवुन दाखवावे. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख मी करणार नाही. मात्र त्यांची निवडणुकीत पडण्याची हाऊस अजून भागलेली दिसत नाही. 2014 ला त्यांच्या जावली मतदारसंघातून ते उभे राहिले होते. त्यांना 22 ते 23000 मते पडली होती. ते चौथ्या क्रमांकावर गेले होते. स्वतःच्या मतदारसंघात त्यांना फक्त 22 ते 23 हजार मतं मिळतात. त्यांनी पाटण मतदारसंघातून कोणी निवडून याव आणि मी कसा निवडून येतो हे असं म्हणणं योग्य नाही.

आणखीन कोणीतरी फडतूस कार्यकर्ता एकेरी बोलला. पदे मिळवण्यासाठी बायको एका पक्षात आणि स्वतः एका पक्षात अशी त्याची अवस्था आहे. त्यांना उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले मी गद्दारी केली. दोन महिनेही आम्ही सांगतोय गद्दारी केली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही अडीच वर्ष संसार केला. त्याच मंत्रिमंडळात आम्हाला बसवलं, हीच अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली प्रतारणा होती. सातारा जिल्ह्यात माझ्या मतदार संघात गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी सातारा जिल्ह्यातील दौऱ्यासाठी वेळ मागीतली आहे. जर त्यांनी या मतदारसंघासाठी वेळ दिली. तर निष्ठा यात्रेला जमलेल्या लोकांपेक्षा पन्नास पट जादा गर्दी माझ्या मतदार संघात दाखवून देवू. तेवढी ताकद, हिंम्मत आमच्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT