Crime  esakal
सातारा

वेण्णा नदीत आढळला परप्रांतीयाचा मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव

सकाळ वृत्तसेवा

मेढा (सातारा) : मेढा-मोहाट पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी वेण्णा नदीत (Venna River) आढळून आला. ही बाब मेढा पोलिसांना समजताच मेढा पोलिस ठाण्याचे (Medha Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, विकास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (The Dead Body Get In Venna River Police Are Immediately Visited There Satara Crime News)

गुरुवारी वेण्णा नदीवर असणाऱ्या मेढा-मोहाट पुलाखाली एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास वेण्णा नदीवर असणाऱ्या मेढा-मोहाट पुलाखाली एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक लोकांच्या साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. यावेळी मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नाव नारायण रायभोई असल्याचे समजले.

ही व्यक्ती परप्रांतीय असून त्याचे वय ४० वर्ष होते. सदर व्यक्ती मेढ्यातील एका मटणाच्या दुकानावर कामाला होती. दारूच्या नशेत वेण्णा नदीवर मासे पकडण्यासाठी गेला असता नदीत पडून डोक्याला जखम होऊन त्यातच या व्यक्तीचा मृत्य झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माने (Police Amol Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली विकास शिंदे, अमोल पवार, नितीन कनाके हे करत आहेत.

The Dead Body Get In Venna River Police Are Immediately Visited There Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT